पूनम सातपुते ह्या महिला डॉक्टर चा मृतदेह त्यांच्याच अंधेरी स्थित घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे . फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. मृतदेहाची स्थिती पाहता पूनम यांचा मृत्यू ३ ते ४ दिवसांपूर्वी झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. मृत्यू का झाला हे मेडिकल रिपोर्ट नंतर कळेल. ४५ वर्षीय पूनम सतपुते ह्या प्रसिद्ध डॉक्टर आहेत.मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार त्या डायबिटीजच्या पेशंट होत्या. मंगळवारी रात्री शेजारच्या व्यक्तींनी अंबोली पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पूनम यांच्या घरातून दुगंर्ध येऊ लागल्याने पोलिसांनी याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी जेव्हा घरात ऐन्ट्री केली तेव्हा त्यांचा मृतदेह हा त्यांच्या बेडवर होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews